वर्गपद्धतीचे दशावतार

शिक्षणक्षेत्रात वर्गपद्धती ((((((((Classroom)))))))) खोलवर रुजली आहे. परंतु विद्यार्थ्याच्या प्रकिया प्रबल होण्यासाठी, ही पद्धत उपयुक्त ठरत नाही, असा दिर्घकालचा आपला अनुभव आहे. त्यामुळे या वर्गपद्धतीत पर्याय शोधणे अनुवार्य झाले आहे, शास्त्रालयांची उभारणी हा असा एक पर्याय आहे. वर्गपद्धती उपयुक्त ठरत नाही याची अनेक कारणे देता येतील, उदाहरणार्थ,

वर्गपद्धतीत –

  • शिक्षक केंद्रस्थानी असतो आणि तोच वर्गाचा नियंत्रक असतो.
  • शिक्षकाने ‘शिकवायचे’ आणि त्यातूनच विद्यार्थ्याने ‘शिकायचे’ असे गृहीत धरलेले असते.
  • विद्यार्थी, हा नेहमीच बाह्यप्रेरणा व बाह्यनियंत्रण यांवर अवलंबून असतो, तो परावलंबी असतो.
  • विद्यार्थी एकत्र असतात, एकत्र बसतात, परंतु त्यांना एकत्र शिकण्यास वाव नसतो. विद्यार्थ्यांना आपल्या सहकाऱ्यांकडून शिकण्याची संधी मिळत नाही.
  • शिक्षकाकडून विद्यार्थ्यांकडे अशी एकदिशा शिक्षण प्रक्रिया कायम अस्तित्वात असते, ती शिकण्यासाठी अपुरी ठरते.
  • अशा शिक्षणप्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या फलाची अंतिम जबाबदारी शिक्षक घेत नाहीत, ती विद्यार्थ्यांची मानली जाते.
  • ‘शिकविणे’ आणि ‘शिकणे’ यामध्ये अंतर राहत असल्याने विद्यार्थ्याने ‘पूर्णपणे’ शिकण्याची शक्यता नसते.
  • कोणीतरी शिकवून यामधून, विद्यार्थ्यांना सर्व संकल्पना साकल्याने व नेमकेपणाने आकलन होण्याच्या शक्यता दुरावतात.
  • शिकणे हे केवळ शिकवण्यावर अवलंबून राहिल्याने विद्यार्थ्यांचा शिकण्याचा वेग, त्यांच्या शिकण्यापेक्षा नैसर्गिक वेगापेक्षा मंद राहतो.
  • प्राप्त माहितीचे उपयोजन करून पाहण्यास वाव नसल्यामुळे ज्ञाननिर्मिती प्रक्रिया अपुरी राहते व प्राप्त ज्ञान अल्पजीवी ठरते.

शाळांतील वर्गपद्धतीमधील या अशा परिस्थितीमुळे ज्ञान आत्मसात करण्याच्या ऐन उमेदीच्या काळात, अनेक वर्षे घालवूनही, विद्यार्थी ज्ञानाने अपूर्ण नि दर्जाने कमजोर राहतात. त्यांची प्रखर कृतिशील अशी वर्षे वाया जातात.

अशा उद्वेगजनक शास्त्रालय हा एक तोडगा ठरू शकतो.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy this blog? Please spread the word :)